Sunday, June 12, 2011

नशिब


नशिब नशिब तरी काय रे
घडवावं तसं घडतं
आयुष्यभर पाठलाग करुन कमावलेलं
एका क्षणात विखुरतं

तळहातावरच्या रेषामधे म्हणे
नशिबाच्या रेषा असतात
जोडिदारच्या नशिबासोबत म्हणे
त्याही जुळवुन घ्याव्या लागतात

आयुष्य पोहोचलं मध्यावर
अन् कशाचा काही पत्ता नाही
विचारलं स्वतःलाच कारण तर
म्हणे नशिबतच यश नाही

प्रेमाची जादु



अनमिक ओढ आहे आज मनात
तुझी.... तुझ्या येण्याची
खुळावल्या ह्या मनाला आता
तुझ्या मिठीत सामावण्याची

हा पाउसही वेडा कसा
बेधुंद कोसळतोय...
आपल्या नात्याचं गुपित कळुन
जणु आनंदानं गातोय

वेडावले रे मी
त्या तुझ्या स्पर्शाने
डोळ्यातुन माझ्या मनात डोकावणार्या
तुझ्या त्या नजरेने

प्रेमाची जादु तुझ्या
हळुवार मनावर चढतेय
साता जन्माच्या शपथा घ्यायला
हे मनही आतुरतयं

प्रेमाची जादु


अनमिक ओढ आहे आज मनात
तुझी.... तुझ्या येण्याची
खुळावल्या ह्या मनाला आता
तुझ्या मिठीत सामावण्याची

हा पाउसही वेडा कसा
बेधुंद कोसळतोय...
आपल्या नात्याचं गुपित कळुन
जणु आनंदानं गातोय

वेडावले रे मी
त्या तुझ्या स्पर्शाने
डोळ्यातुन माझ्या मनात डोकावणार्या
तुझ्या त्या नजरेने

प्रेमाची जादु तुझ्या
हळुवार मनावर चढतेय
साता जन्माच्या शपथा घ्यायला
हे मनही आतुरतयं 

माझी पहीली कविता


काहीतरी तुटतयं
काहीतरी जुळतयं
सगळं काही असताना
काहीतरी  निसटतयं

सोबतीची उणीव
आज जाणवतेय
गर्दीतही आज
एकटेपण वाटतयं

आनंद,उत्साह,जल्लोष
सर्वदूर पसरतोय
मन मात्र माझं
असं एकाकी भरकटतयं

हेच आयुष्य हेच
जीवन समजायचं
नव्या उद्यापासुन
नवीन जीवन जगायचं

रुचिरा 12/06/11