Sunday, June 12, 2011

माझी पहीली कविता


काहीतरी तुटतयं
काहीतरी जुळतयं
सगळं काही असताना
काहीतरी  निसटतयं

सोबतीची उणीव
आज जाणवतेय
गर्दीतही आज
एकटेपण वाटतयं

आनंद,उत्साह,जल्लोष
सर्वदूर पसरतोय
मन मात्र माझं
असं एकाकी भरकटतयं

हेच आयुष्य हेच
जीवन समजायचं
नव्या उद्यापासुन
नवीन जीवन जगायचं

रुचिरा 12/06/11

No comments:

Post a Comment