अनमिक ओढ आहे आज मनात
तुझी.... तुझ्या येण्याची
खुळावल्या ह्या मनाला आता
तुझ्या मिठीत सामावण्याची
हा पाउसही वेडा कसा
बेधुंद कोसळतोय...
आपल्या नात्याचं गुपित कळुन
जणु आनंदानं गातोय
वेडावले रे मी
त्या तुझ्या स्पर्शाने
डोळ्यातुन माझ्या मनात डोकावणार्या
तुझ्या त्या नजरेने
प्रेमाची जादु तुझ्या
हळुवार मनावर चढतेय
साता जन्माच्या शपथा घ्यायला
हे मनही आतुरतयं
No comments:
Post a Comment